Marathi Rendering
॥ गणपती स्तोत्र ॥
Sankata Nashana Ganesh Stotram
Ganesh Stotram Marathi Lyrics (8 Verses)
This Ganesh Stotram in Marathi is a devotional verse rendering by Shridhar of the original Sanskrit Sankata Nashana prayer. Chanting this Ganesh Stotram in Marathi is a daily tradition for devotees seeking Ganpati Bappa's blessings for knowledge, wealth, and freedom from obstacles.
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते । सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक । अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर । विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन । पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ । एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें । श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥
Want the word-by-word meaning in marathi ?
Read with Marathi meaning →