Ganesha Strotram

|| ॐ गं गणपतये नमः ||

Wishing You a Joyful Ganeshotsav 2025! 🙏

May Lord Ganesha bless your home with happiness, prosperity, and auspicious beginnings.
Find Aartis, Stotras, mantras, stories, and eco-friendly Ganesh festival tips — all in one place at GaneshAStotram.com 
Advertise on GaneshAStotram.com —reach a devotional, cultural, and festive audience directly. Visit the Contact page.

Ganesh Aarti (Complete Collection)- Marathi

Ganesh Aarti Marathi, English, Hindi

|| सुख करता, दुखहर्ता ||

सुख करता, दुखहर्ता, वार्ता विघ्नाची नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची
कंठी झलके माल मुकताफळांची
जय देव, जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव, जय देव ||
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया
जय देव, जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव, जय देव  ||
लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना

जय देव, जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव, जय देव ||

|| शंकराची आरती ||

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

 ||श्री देवीची आरती ||

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

|| पांडुरंगाची आरती ||

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।।
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

|| ज्ञानदेवाची आरती ||

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |

आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |

नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |

साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |

पायीं मस्तक ठेविलें || ३ ||

|| दत्ताची आरती ||

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

 सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥

पराही परतली तेथे कैचा हा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

 दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

 दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

|| घालीन लोटांगण ||

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *